प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर:जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी पार पडला.रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ९ हजार वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.
कै.केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा विद्यमान जि.प.सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गडहिंगलज तालुक्यातील 'जीवन शिक्षण मंदिर मुत्नाळ' येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वह्या वाटप करण्यात आल्याने पालकांनी समाधान व्यक्त करून रेडकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकल.
यावेळी शाळेचे मुद्याध्यापक,शिक्षक वृंद,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

