Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कणकवलीत रस्त्यालगतच्या गटारात सापडला ५ ते ६ फुटांचा अजगर!

कणकवलीत रस्त्यालगतच्या गटारात सापडला ५ ते ६ फुटांचा अजगर!

राठा मंडळ रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी!

सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू!

कणकवली : शहरातील मराठा मंडळ रोड परिसरात रस्त्यालगतच्या गटारामध्ये सुमारे ५ ते ६ फुटांचा अजगर आढळल्याने शनिवारी परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. कोणतीही जीवितहानी न होता बचाव मोहीम यशस्वी पार पडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

पावसाळ्यात साप व इतर वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी अशा प्राण्यांना इजा न करता त्वरित वनविभाग किंवा सर्पमित्रांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital