Dailyhunt
खेडमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

खेडमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

खे : भारतीय जनता पार्टी च्या स्थापने दिनानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामागे वैभवजी खेडेकर यांची संकल्पना असून नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदूविषयी सल्ला तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मोफत दिले जाणार आहे.
हे शिबिर खेड परिसरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
दिनांक ६ एप्रिल २०२६ : श्री रहीम सहिबोले (नगरसेवक) कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, खेड
दिनांक ७ एप्रिल २०२६ : समाज मंदिर, ओम चैत्य मारुती नगर, खेड
दिनांक ८ एप्रिल २०२६ : श्रीकृष्ण मंदिर, कुंभारसाई, खेड
संपर्क क्रमांक :
श्री. नंदू साळवी (शहराध्यक्ष, खेड) - ८०८७९८२८९९.
नगरसेवक श्री.रहीम सहीबोले (वॉर्ड क्रमांक २)-८०८७५९७३३३,
नगरसेविका सौ.वैभवी वैभव खेडेकर (वार्ड क्रमांक ६),८८३०१५६०९९.
नगरसेविका सौ.स्वप्नाली राकेश चव्हाण (वार्ड क्रमांक ७), ८८५०७५२८४२.
विवेक कदम (इन्फिगो) - ८९८३३५६७२८
खेड शहरातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास उपस्थित राहून डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital