परुळेच्या सोमेश सावंतने पटकावले प्रथम पारितोषिक
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले या पारंपरिक स्पर्धेचे कौतुक..
वेंगुर्ले : दाजी नाईक
श्री देवी भराडी मित्रमंडळ, कोचरा आणि 'श्री विष्णू (आप्पा) विठ्ठल फणसेकर मित्रमंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने कोचरा येथे आयोजित करण्यात आलेली 'भव्य नारळ लढविण्याची स्पर्धा' अत्यंत उत्साहात आणि थरारक वातावरणात पार पडली.
या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला असून एकूण २३६ स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा रात्री उशिरापर्यंत रंगली होती. दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पर्धेला भेट देऊन या पारंपरिक स्पर्धेचे कौतुक केले.
स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य शंकर घारे व जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उदय फणसेकर, राजू हंजनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व पाहुण्यांचा मंडळाच्या वतीने भावूक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, नगरसेवक संदेश निकम, कमलेश गावडे, मनोज उगवेकर, प्रसाद पाटकर, निलेश सामंत, चेतन सामंत, म्हापण उपसरपंच ठाकूर, तुषार साळगावकर यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक (₹ १०,०२६/- व ट्रॉफी): सोमेश सावंत (परुळे)
द्वितीय क्रमांक (₹ ५,०२६/- व ट्रॉफी): स्वरूप तळगावकर (मालवण, वायरी)
तृतीय क्रमांक (₹ १,०२६/- व ट्रॉफी): पंकज गोसावी (पाट)
चतुर्थ क्रमांक (₹ १,०२६/- व ट्रॉफी): पराग हंजनकर (कोचरा)
याशिवाय क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, तसेच उपस्थित प्रेक्षकांमधून १० भाग्यवंत स्पर्धकांची 'लकी ड्रॉ'द्वारे निवड करून त्यांना आकर्षक बक्षीसे प्रदान करण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभ
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, कोचरा पतसंस्थेचे चेअरमन यशवंत गोसावी, पंचायत समिती सदस्य आप्पा फणसेकर व मित्र मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पारंपारिक खेळाचा आनंद लुटत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आयोजकांनी सर्व खेळाडू व ग्रामस्थांचे आभार मानले.

