मसुरे | झुंजार पेडणेकर : कोकण आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी मालवण तालुक्यातील वेरली गावचे सुपुत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे
मालाड येथील सुरेश मापारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
याबाबत सुरेश मापारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सुरेश मापारी हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुंबई मालाड येथे सामाजिक कार्य आणि पक्षाचे ध्येय धोरणे राखून सुयोग्य असे काम करतात. मुंबई मालाड कांदिवली परिसरामध्ये अनेक समाजभिमुख उपक्रम ते नेहमी राबवत असतात यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप, शासकीय कामगारांना पावसाळी रेनकोट वाटप, अनेक गरजू गरीब लोकांना वेळोवेळी आर्थिक मदत करणे, भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळापर्यंत राबविणे असे अनेक विविध उपक्रम सुरेश मापारी राबवत आहेत. मुंबई सहित मालवण तालुक्यामध्ये सुद्धा सुरेश मापारी यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळातही मुंबई येथे सुरेश मापारी यांनी अतिशय चांगले काम केले होते.
त्यांच्या या कार्याची दखल कोकण आघाडीने घेऊन सिंधुदुर्गाच्या या सुपुत्रावर कोकण आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, मुंबई महामंत्री विनोद शेलार, बाळा तावडे , बाबा सिंग, आप्पा बेळवरकर, निखिल व्यास आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश मापारी यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे मालाड वार्ड महामंत्री, मालाड येथे दोन वेळाने वॉर्ड अध्यक्ष,मालाड मंडळ मंत्री, जिल्हा सचिव उत्तर मुंबई, मालाड महामंत्री,उत्तर मुंबई जिल्हा सदस्य अशी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पदे भूषविली आहेत. यावेळी बोलताना सुरेश मापारी म्हणाले, मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करणार असून जे काही प्रलंबित प्रश्न आणि समस्या असतील ते कोकण आघाडीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. सुरेश मापारी यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री भाई गिरकर, समाजसेविका दर्शना सक्सेना,नरेंद्र राठोड, सेजल देसाई, भरत लिंबाचिया, सुनील भालेराव, चिंतन जोशी आणि
मालाड कांदिवली येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच मसुरे वेरली ग्रामस्थ,
यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

