कोकणच पर्यटन वयात येतय … !
वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
अफवा आणि बुद्धीभेदाचे गारूड जनतेच्या मनावर अस काही निर्माण करायचे की त्यातून बाहेर येऊन चांगल्या-वाईटाचा विचारच कोणाला करता येऊ नये यासाठीच विविध राजकिय पक्षांच्या काही नेत्यांकडून खुप मेहनत घेतली जाते.
त्यातून कोकण विकासाच्याबाबतीत तसूभरही पुढे जात नाही ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या प्रकल्पाच्याबाबतीत कोणी सकारात्मक विचारांची मांडणी केली तर तो विचार मांडणारी व्यक्ति लगेचच सत्ताधाऱ्यांचा भाट ठरवला जातो. परंतु जे कोणत्याही प्रकल्पाला, चांगल्याला विरोध करतात त्यातले कितीजण नवीन कोणता प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न करतात. तर त्यात तसे कोणी प्रयत्न करताना दिसत नाहीत. विनाशकारी प्रकल्प कोकणात यावेत असं कोणालाच वाटत नाही. परंतु काही येण्यापूर्वी, चर्चेचे दरवाजे बंद करायचे आणि कोकणात काही होत नाही म्हणायचे ही राजकिय दुटप्पी भुमिका झाली….
आजच्या घडीला जगभरामध्ये पर्यटन व्यवसाय कमालीचा तेजीत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाययातूनच आर्थिक समृद्धीच्या स्वप्नांना आकार येऊ शकतो. कोकणाला निसर्गाने भरभरून दिलय. कोकणच कोकणपण जपल पाहिजे आणि पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असणारी मानसिकताही सकारात्मकतेत बदलण्याची आवश्यकता कोकणाला लागून असलेल्या गोवा राज्यामध्ये पर्यटनासाठी देश-विदेशातून पर्यटक जातात. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये गोवा राज्यामध्ये पर्यटकांना मिळणारी वागणुक आणि पर्यटकांशी एकूणच जी लुटमार करण्याची पद्धती त्याची फारमोठी चर्चा पर्यटकांमध्ये होतेय. त्याचबरोबर कोकणातील किनारपट्टीचा मोकळा श्वास येणाऱ्या पर्यटकांना घेता येतो. गोव्यापेक्षाही कोकणातील समुद्र किनारे अधिक स्वच्छ सुंदर आहेत. यामुळे देशभरातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचा ओढा कोकणाकडे वाढू लागला आहे. आतापर्यंत कोकणातील पर्यटन व्यवसायातून महाराष्ट्राच्या तिजोरीला मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. याचा विचारच फार कधी सत्ताधाऱ्यांनी केला नाही. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्राने कोकण नेहमीच दुर्लक्षित ठेवलं. १९९७ साली कोकणच्या पर्यटनाचा विचार प्रथम करण्यात आला. त्यावेळी कोकणातील सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून त्याची घोषणा करण्यात करण्यात आली. तेव्हा कुठे कोकणाला स्वत:च्या निसर्गसौंदर्याची जाग आली.
निसर्गाने कोकणाला काय-काय दिलय याची साधी कल्पनाही कोकणाने कधी केली नाही. पर्यटन व्यवसायच कोकणाला वरदान ठरू शकतो. विकासाचा आणि आर्थिक सक्षमतेचा मार्ग याच पर्यटन व्यवसायातून होईल. हा इतका विचार कधीच कोकणात झाला नाही. कोकणच्या कॅलिफोर्निया झाला पाहिजे. या अशा कॅलिफोर्नियाच्या स्वप्नामध्येच कोकण गेली अनेक वर्षे रमलेले होते. कॅलिफोर्नियाच्या या स्वप्नातून पहिल्यांदा जाग करण्याच काम १९९७ साली विद्यमान खा.नारायण राणे यांच्या प्रयत्नातून झाला. आणि मग कोकणातील पर्यटनाची चर्चा होऊ लागली तोपर्यंत कोकणातील रायगड जिल्ह्यात बऱ्यापैकी उद्योगांनी हातपाय पसरले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात उद्योग उभे राहिले. परंतु त्याचबरोबर रायगडच्या किनारपट्टीवर बऱ्यापैकी पर्यटन व्यवसाय वाढत गेला. रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर वर्षभरात हजारो पर्यटक येत असतात. त्यामुळे निश्चितच रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला वेगळी गती प्राप्त झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये औद्योगिकरण झाले. उद्योग उभे राहिले. परंतु त्याचा फारमोठा फायदा कोकणातील तरूणांना झाला असे घडले नाही. उत्तर रत्नागिरीत हे उद्योग उभे झाले. परंतु काही ठराविक उद्योगांपलिकडे उद्योग उभे राहिले नाहीत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग विस्ताराला ठराविक एका मर्यादेपलिकडे काही होऊ शकले नाही. तीच तऱ्हा सिंधुदुर्गची आहे. सिंधुदुर्गचा पर्यटन जिल्हा म्हणून विकास करायचा. रत्नागिरीचा फलोद्यान आणि प्रक्रिया उद्योगातून विकास साधायचा आणि रायगड जिल्ह्याचा औद्योगिक करणातून विकासासाठी प्रयत्न करायचे हा विचार खा. नारायण राणे यांनी राज्यात मंत्री असताना मांडला होता. तसा त्यांचा प्रयत्नही राहीला. परंतु सी वर्ल्ड सारख्या कोकणचा चेहरा बदलणाऱ्या प्रकल्पालाच राजकिय विरोध झाला. आतापर्यंत अगदी आता देखिल कोकणात येणाऱ्या प्रकल्पांना केवळ आणि केवळ राजकारणातूनच विरोध होतो. अफवा आणि बुद्धीभेदाचे गारूड जनतेच्या मनावर अस काही निर्माण करायचे की त्यातून बाहेर येऊन चांगल्या-वाईटाचा विचारच कोणाला करता येऊ नये यासाठीच विविध राजकिय पक्षांच्या काही नेत्यांकडून खुप मेहनत घेतली जाते. त्यातून कोकण विकासाच्याबाबतीत तसूभरही पुढे जात नाही ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या प्रकल्पाच्याबाबतीत कोणी सकारात्मक विचारांची मांडणी केली तर तो विचार मांडणारी व्यक्ति लगेचच सत्ताधाऱ्यांचा भाट ठरवला जातो. परंतु जे कोणत्याही प्रकल्पाला, चांगल्याला विरोध करतात त्यातले कितीजण नवीन कोणता प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न करतात. तर त्यात तसे कोणी प्रयत्न करताना दिसत नाहीत. परंतु कोणी स्वत:च मत मांडल की जी एक केवळ विरोध करणारी ठराविकच आहेत. त्यांच्याकडुन काही होण्यापूर्वीच बेसूर आळवला जातो. या बेसूराची आळवणी कधीतरी थांबायला हवी. विनाशकारी प्रकल्प कोकणात यावेत असं कोणालाच वाटत नाही. परंतु काही येण्यापूर्वी, चर्चेचे दरवाजे बंद करायचे आणि कोकणात काही होत नाही म्हणायचे ही राजकिय दुटप्पी भुमिका झाली. पर्यटन विकासात कोकण अलिकडे बऱ्यापैकी पुढे जात आहे.
कोकणातील निवती रॉक याठिकाणी गुलदार युद्धनौका समुद्रात स्थिरवण्यात यश आलं आहे. भारतातील हा पहिला प्रयोग आणि प्रयत्न आहे. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या युद्धनौकेकडे प्रवाळाचा एक वेगळाच आनंद स्कुबा डायव्हींग, पाणबुडीद्वारे पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटन विकास महामंडळ, आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणच्या पर्यटन क्षेत्रात फारमोठे पुढच पाऊल टाकण्यात आलं आहे. जगामध्ये अमेरिकेत फ्लोरिडा आणि ऑस्ट्रेलियातील एमएमएएस स्पॅन सारखा समुद्रतळाशी आनंद देणारा प्रकल्प राबविण्यात आला आहे. कोकणातील पर्यटनात असे नवनवीन प्रकल्प आणले जात आहेत. आपल्यातील नकारात्मकता बदलून सकारात्मकतेने त्याचा विचार केला गेला तर निश्चितपणे कोकणातील पर्यटन तर वाढेलच परंतु त्याचबरोबर कोकणाला एक आर्थिक सक्षम बनवणारा एक नवा मार्गही यातून सापडेल.

