Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा कोंडगे ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान

लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा कोंडगे ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान

लांजा (प्रतिनिधी): लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि हवालदार आशिष शेलार यांचा कोंडगे ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि हवालदार आशिष शेलार यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले असून याबद्दल १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर
कोंडगे ग्रामस्थांच्या वतीने या दोघांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कोंडगे ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व हवालदार आशिष शेलार यांचा शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी
सरपंच डॉ. एस. व्ही. कदम, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष स्वप्नील जाधव तसेच ग्राम सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय कदम यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
लांजा पोलीस ठाण्यात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात कोंडगे गावाच्या वतीने मिळालेल्या सन्मानाबद्दल पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. कोंडगे गावातील समस्या सोडविण्यासाठी तसेच गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून यापुढेही आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, कोंडगे गावातील अवैध दारूधंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने अमोद सरंगळे यांचाही शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital