Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लायन्स क्लब मालवणचा आदर्शवत सामाजिक उपक्रम

लायन्स क्लब मालवणचा आदर्शवत सामाजिक उपक्रम

गोमाते साठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द ; शेतकऱ्यांना पावसाळी खोळ वितरण ; लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी उपस्थित

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवणच्या वतीने आदर्शवत असा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना पावसाळी खोळ शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. या सोबतच गोमाते साठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत, क्लबचे पदाधिकारी यांनी मालवण शहरातील साईमंदिर मागील धुरीवाडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

पावसाळी कालावधीत शेतकऱ्यांसाठी आवश्यक्ष पावसाळी खोळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. तसेच गोमातेला खाद्य देण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, वैशाली शंकरदास, जयश्री हडकर, फॅनी फर्नांडिस, उमेश शिरोडकर, विनोद शंकरदास यांसह शेतकरी राजन आंबेरकर, निक्सन फर्नांडिस, पुजा माळकर, रवीना आंबेरकर, रेश्मा गांवकर, सीमा बुटे, येलोत्रीन फर्नांडिस यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital