Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिपळुणात जल्लोषात स्वागत

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिपळुणात जल्लोषात स्वागत

भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान चिपळूण येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीमुळे पाग-चिपळूण परिसरातील वातावरण भारावून गेले. महसूलमंत्री ना. बावनकुळे शनिवारी दि. १ पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, रायगड जिल्ह्यातील दौरा पूर्ण करून ते मोटारीने चिपळूणमार्गे रत्नागिरीकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी पाग-चिपळूण येथील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनानिमित्त चिपळूण ग्रामीण मंडळ व शहर मंडळाच्या वतीने भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या स्वागतावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, सरचिटणीस सौ. सुप्रिया उतेकर, चिटणीस अनिल सावर्डेकर, चिटणीस योगेश शिर्के, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तथा भाजपच्या जिल्हा निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, चिपळूण ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेविका शीतल रानडे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे यांच्यासह माजी नगरसेवक विजय चितळे, ॲड. नयना पवार, अभय चितळे, बाळा दाते, राकेश दाते, अनवर जबले, रमण डांगे, अर्बन बँकेचे संचालक रत्नदीप देवळेकर, अनिल चिले, रुपेश आवले, सुनील वाजे तसेच भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फुलांचे गुच्छ देऊन आणि घोषणांच्या गजरात ना. बावनकुळे यांचे स्वागत केले.

यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यांच्या भेटीमुळे चिपळूणमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital