Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात;

महेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात;

जिल्हाध्यक्ष पद मिळो, मी पाठीराखा' - दत्ता सामंत

निष्ठा आणि दातृत्वाचा गौरव, विविध मान्यवरांची उपस्थिती

आचरा-अर्जुन बापर्डेकर

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांचा 46 वा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आचरा येथे साजरा करण्यात आला.

यावेळी शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महेश राणे यांच्या प्रामाणिक निष्ठा आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा केली. महेश राणे यांना जिल्हाध्यक्ष पद जरी मिळाले तरी मी त्यांचा पाठीराखा बनून सदैव त्यांच्या पाठीशी राहीन असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी बोलताना सामंत यांनी महेश राणे यांच्या खडतर वाटचालीतून या पदापर्यंत पोहोचल्याचा उल्लेख करून त्यांच्या प्रेमळ, सहकार्य आणि हसतमुख व्यक्तिमत्वामुळे अनेक मित्र मंडळी त्यांनी गोळा केली.याची प्रचिती आज दिसून येत असून आचरा गावच कुटुंब बनविल्याचे सांगितले. विविध मान्यवरांनी महेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या दातृत्व, प्रेमळ आणि परोपकारी स्वभावाचेही त्यांनी कौतुक केले. पक्ष संघटनेसाठी राणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

उद्योजक नासिर शेख, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर,बावडा येथील माजी सभापती भैया पाटणकर, ,शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष विनायक बाईत,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस,आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, खरेदी विक्री संघ मालवणचे अध्यक्ष राजन गावकर, राजा गावकर,बबन शिंदे,बाळू कुबल,जॉन न-होना, संतोष कोदे, जयप्रकाश परुळेकर,देवगड नगरसेवक बुवा तारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर,मकरंद राणे, मिहिर राणे,शेखर राणे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर,प्रफुल्ल प्रभू, डॉ प्रमोद कोळंबकर,किसन मांजरेकर ,आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, महेंद्र घाडी,चंदू कदम,मनोज हडकर,भाऊ हडकर,राजन पांगे,उदय घाडी,यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला *शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महेश राणे यांना दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital