गौरव पोंक्षे माखजन: कोकण आणि गणेशोत्सवाच नात अनन्यसाधारण मानल जात. गणेशोत्सवात रंगणाऱ्या आरत्या सर्वत्र प्रसिद्ध असतात.आरत्या रंगतदार होण्यासाठी तबला,नाळ,पखवाज,ढोलकी यांचा अंतर्भाव असतो.
आणि आगमन व विसर्जन मिरवणुकीला ढोल,ताशे असतात.
सध्या गणेशोत्सवाची चाहुल लागल्याने ही वाद्ये घडावणाऱ्या व दुरुस्त करणाऱ्या दुकानात लगबग पहायला मिळत आहे.
गणपती बाप्पा च्या आगमनाला अगदी दहा दिवस उरल्याने वाद्य दुरुस्तीची गडबड पाहायला मिळत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद्य दुरुतीचे काम वाढत असल्याने,या दुकानांमध्ये हंगामी काम करणाऱ्या कामगारांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे.
ए.आय आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या युगात अनेक वाद्ये आली असली तरी पारंपारिक साधनांचा असलेला सुमधुर आवाज,आणि बाज यामुळे आणि निर्माण होणारी वातावरण निर्मिती आगळी वेगळी असल्याने,या वाद्यांना आजही तितकीच मागणी आहे.व पर्यायाने दुरुस्तीची कामे देखील निघत असल्याने हा व्यवसाय आजही बाजारात टिकून आहे.
सध्या संगमेश्वर तालुक्यातील माखजन ,आरावलीत या वाद्य व्यावसायिकांकडे गर्दी पाहायला मिळत आहे.शिवाय बाजारात ढोलकी,तबला,नाळ,पखवाज आदिंवर मारलेली थाप सतत कानावर पडत आहे.

