Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माळगावला १३ ऑगस्टला तालुकास्तरीय 'रानभाजी महोत्सव'

माळगावला १३ ऑगस्टला तालुकास्तरीय 'रानभाजी महोत्सव'

सुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, उमेद व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन १३ ऑगस्टला सकाळी १० वाजता माळगाव येथील अॅड.

गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला बांधकाम सभापती संतोष साटविलकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनःश्याम झाड, जि. प. सदस्य सुमेधा पाताडे, अक्षता गावडे , वर्षा सांबारी, क्षमा हडकर, सोनाली घाडीगावकर, शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तहसीलदार गणेश लव्हे आणि गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तालुक्यातील रानभाज्यांचे महत्व, त्यांचे पौष्टिक मूल्य, पारंपरिक खाद्यसंस्कृती तसेच शेतकरी व नागरिकांमध्ये रानभाज्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाटील व माळगाव सरपंच चैताली साळकर यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital