Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक करण्यास उद्देशपत्र वितरण समारंभ

मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक करण्यास उद्देशपत्र वितरण समारंभ

त्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या वितरण : मालवण दैवज्ञ भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र सागरी मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने उद्देशपत्र वितरण समारंभ शुक्रवार, दि.

३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मालवण येथील दैवज्ञ हितवर्धक समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निलेश राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, आमदार दीपक केसरकर तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई मुख्यकार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर,
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, वायरी ग्रामपंचायत सरपंच भगवान लुडबे, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपास्थित राहावे असे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital