Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मालवणात ऑटो गॅरेजला भीषण आग

मालवणात ऑटो गॅरेजला भीषण आग

१५ दुचाकीसह एक कार जळून खाक

मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून खाक झाली.

स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करून तसेच नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र भडकलेली आग विझे पर्यत बहुतांश सर्व गाड्या जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे बोलले जात होते. मात्र नेमके कारण समजू शकले नाही.

नगरपालिकेचा अग्नीशमन बंब दुरुस्तीसाठी असल्याने तो उपलब्ध न झाल्याने नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे तसेच नागरिक यांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु राहिले. नागरिकांनी जीव धोक्याय घालून मदतकार्य केले.

आगीची माहिती समजताच नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, स्वच्छता आरोग्य सभापती पूनम चव्हाण, वसंत गांवकर यांसह नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मालवण पोलीस, नगरपरिषद कर्मचारी वं नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital