मंडणगड प्रतिनिधी : मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनच्या माध्यमातून नुकत्याच घेण्यात आलेल्या होमी भाभा बाल वैज्ञानिक परिक्षेत मंडणगड येथील अर्थव जयराम हलगवार याने रौप्य पदक पटकावित बाल वैज्ञानिक होण्याचा मान मिळवून तालुक्यांचा लौकीक वाढविला आहे.
कोल्हापूर विभागातील चार जिल्ह्यातील केवळ अकरा विद्यार्थ्यांची मुलाखतीकरिता निवड झाली होती. परिक्षेत अर्थव याने मंडणगड तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पर्यावरण पूरक गौण खनिज उत्खनंन या विषयावर सखोल अभ्यासात्मक प्रतिकृती सादर केली व सिलव्हर मेडल मिळवीले. सध्या रोटरी स्कूल खेड येथे शिक्षण घेत असलेल्या अर्थव याने संगीत, कला, क्रीडा, नृत्य, वादन, व शाळेचा नैमित्तीक अभ्यास यात उत्तम प्रगती करीत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची चणूक यापुर्वी दाखवली आहे. मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे झालेल्या कार्यक्रमात त्याला सन्मानीत करण्यात आले त्यास प्रशालेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षका दीपाली दरेकर, तेजश्री क्षीरसागर, तनुजा चव्हाण, राहूल चव्हाण, प्रसाद सावंत, वैष्णवी धुमाळ प्राजक्ता गावडे ग्रंथपाल सिध्दी दामले यांचे मार्दगर्शन मिळाले त्याने मिळवीलेल्या या यशाबद्दल तालुक्यातून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छाही देण्यात येत आहेत.

