गौरव पोंक्षे माखजन: संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेतील माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यलयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोज शिंदे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी गौरव पोंक्षे,संजय सूर्यवंशी,सचिन साठे,पर्यवेक्षक अंबादास घाडगे मुख्याध्यापक महादेव परब यांनी मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,शिक्षक प्रतिनिधी महादेव शिंदे,शिक्षकेतर प्रतिनिधी नितीनराज दळवी आदिंसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष मनोज शिंदे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

