Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मसुरे येथे 'आमदार चषक' नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन

मसुरे येथे 'आमदार चषक' नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन

सुरे | झुंजार पेडणेकर :शिवसेना जि.प. मसुरे विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून भव्य 'आमदार चषक' नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता मसुरे बाजारपेठ येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेला आमदार श्री. निलेश राणे, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रथम क्रमांक: ₹६,६६६/- व चषक,

द्वितीय क्रमांक ₹३,६६६/- व चषक,

तृतीय क्रमांक: ₹६६६, चतुर्थ क्रमांक ₹६६६.

प्रथम १२८ स्पर्धकांनाच प्राधान्य दिले जाईल. प्रवेश फी ₹२००/- ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी लागणारे नारळ मंडळाच्या वतीने पुरविले जातील.

या पारंपरिक व चित्तथरारक स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी व क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जि.प. मसुरे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital