Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुणगे येथे नारळ लढविणे स्पर्धेत मयूर धुवाळी प्रथम!

मुणगे येथे नारळ लढविणे स्पर्धेत मयूर धुवाळी प्रथम!

सुरे | झुंजार पेडणेकर श्री भगवती यंगस्टार मित्र मंडळ, मुणगे - देऊळवाडी पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धेत मयूर धुवाळी यानी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उदघाटन श्री देवी भगवती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये आणि विश्वस्त श्री.

अनिल धुवाळी यांच्या हस्ते झाले.

बक्षीस वितरण कार्यक्रमास मुणगे सोसायटी अध्यक्ष श्री. गोविंद सावंत, प्रमोद वळंजू, प्रभाकर देवळी, विजय हिर्लेकर, विजय परब, चंदन दळवी, समीर कांबळे, दशरथ मुणगेकर, रणजित आईर, दादा वळंजू, गणेश राऊळ, तेजस शेट्ये, पारस वळंजू, रितेश आईर, गोरख वळंजू, मोहन परब, अंश देवळी, मेघेश वळंजू, विवेक परब, ईशान्त गुरव, श्लोक गुरव आदी उपस्थित होते.

प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 3 हजार रुपये श्री भगवती यंगस्टार मित्र मंडळ आणि श्री. चंदन दळवी यांचे कडून आकर्षक चषक श्री. मयूर धुवाळी यांनी पटकावला.

द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये व चषक श्री भगवती यंगस्टार मित्र मंडळ आणि श्री. चंदन दळवी यांचे कडून आकर्षक चषक
श्री. पृथ्वीराज घाडी यांनी पटकावला.
तृतीय क्रमांक रोख एक हजार रुपये श्री. दिगंबर वसंत बागवें यांज कडून आणि आकर्षक चषक कै. ओमकार दुखंडे आणि कै. प्रकाश बाबी तुरी यांचे स्मरणार्थ श्री. निखिल तुरी यांचे कडून श्री. पृथ्वीराज घाडी यांनी पटकावला.

तर चतुर्थ क्रमांक रोख पाचशे रुपये कै. ऋतुजा मोतीराम वळंजू यांच्या स्मरणार्थ कु. मनवा वळंजू यांचे कडून व आकर्षक चषक कै. पप्पा वळंजू यांचे स्मरणार्थ कु. गोरख वळंजू यांचे कडून वसंत मेस्त्री यांनी पटकावला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital