नायजेरियामधील एका उत्सवात महिलांवर कथित अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली आहे.
अलुए-डो फेस्टिव्हलदरम्यान काही तरुणांनी महिलांना लक्ष्य केल्याचे अहवालात म्हटले आहे. अनेक महिलांनी या घटनेबाबत आपले अनुभव सांगितले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनेक संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नायजेरिया :डेल्टा स्टेटमधील अलुए-डो फेस्टिव्हलदरम्यानमहिलांवर कथित अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरलोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
अहवालानुसार, उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी काही तरुणांनी महिलांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि अनेक लोक उपस्थित असूनही हा प्रकार रोखला गेला नाही.
पीडित महिलांमध्येविद्यापीठातील विद्यार्थिनींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पीडितेने सांगितले की, तिला जमावाने घेरून मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला, तसेच तिचा फोनही हिसकावून घेतला.
या प्रकरणीपोलिसांनी कारवाई करतअनेक संशयितांना अटक केली आहे. त्यामध्ये स्थानिक समुदायातील एक नेता आणि काही तरुणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
महिला हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे समाजातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

