Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नियमित आरोग्य तपासणी आणि जागृती हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली - सौ. उज्वला येळावीकर

नियमित आरोग्य तपासणी आणि जागृती हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली - सौ. उज्वला येळावीकर

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसेवा सप्ताहाचा समारोप

​कुडाळ:
'उत्तम आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि त्याबाबतची जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे.

समाजात आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे ही काळाची गरज असून, समाजहिताचे असे उपक्रम सातत्याने राबवणे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य संकल्प आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. उज्वला येळावीकर यांनी केले.

​महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'जनसेवा सप्ताहा'च्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या सप्ताहांतर्गत सौ. उज्वला येळावीकर यांच्या विशेष पुढाकारातून कुडाळ येथील पूर्ण प्राथमिक पांडुरंग शेठ पडते (पडतेवाडी) शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

​या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय टीमने सहभागी होऊन विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. श्रेयश परब, डॉ. मुक्ता दुधगावकर, नर्स विन्या नार्वेकर आणि फार्मासिस्ट विवेक आंगणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे आरोग्यविषयक मार्गदर्शन करत तपासणी पूर्ण केली.

​कार्यक्रमादरम्यान सौ. येळावीकर यांनी उपस्थित विद्यार्थी व उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, लहान वयातच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे चालवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढेही असे विविध लोककल्याणकारी व समाजोपयोगी उपक्रम नियमितपणे राबवत राहील.
​या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital