चिपळूण (प्रतिनिधी) : अहिल्याबाई होळकर स्मृती दिन व ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडस येथे गुरुवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रकल्पामधील तब्बल ५७ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आंबडस पेठेसह शाळा परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमात खेळाडूंसोबत पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत खेळाडूंनी परिसरातील कचरा साफ करून स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. यावेळी CMC कमिटीतील राधिका मोरे, सुजित महाडिक, श्रावणी बडबे, स्थानिक ग्रामस्थ, सहाय्यक शिक्षक महाडिक सर, धाडवे सर, क्रीडाशिक्षक सावंत सर तसेच केंद्रप्रमुख तुषार कदम उपस्थित होते. मुख्याध्यापक यादव सर, सहाय्यक शिक्षक सावर्डेकर सर, कुंभार सर आणि स्पोक ट्रेनर शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. खेळाडू, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छता अभियान यशस्वी झाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.

