मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी.
चराठा ओटवणे मार्गांवरील तो चर अखेर श्रमदानातून बुजवीला.
ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे चराठा मार्गांवर मेट येथे अपघाताला निमंत्रण देत असलेला आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाच्या निकृष्ठ पद्धतीचा दाखला देणारा रस्त्याच्या मधोमध असणारा चर अखेर ११ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ओटवणे येथील युवकांनी बुजवीला.ओटवणे चॅरिटेबल ग्रुपने संभंदित खात्याकडे यासाठी पैसे नसल्याने या कामासाठी १, १ रुपया मदत करण्यासाठी लोकांकडे आवाहन केले आणि त्यातून लागणारे सामान विकत आणत श्रमदान करत तो चर अखेर बुजविला .
ओटवणे चराठा मुख्य मार्गाची दुरुस्ती झाली खरी पण त्यानंतर रस्त्याची ठीक ठिकाणी झालेली दुर्दशा याची वारंवार जाणीव करून देवून सुद्धा संबंधित यंत्रणा सुशेगात आहे. या मार्गात रस्त्याच्या दुरुस्ती नंतर ठेकेदाराने संरक्षक भिंतीचे काम केले.रस्त्याच्या मध्ये पाईप घालण्यासाठी चर मारला आणि हा चर व्यवस्थित बुजवला नसल्याने पुनः चर पडला . कंत्राटदाराने चर बुजवीला मात्र त्यानंतर त्यातील माती दबून त्याठिकाणी पुनः चर पडला जो वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे .यावेळी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्यातील माती वाहून गेली आणि तो पुनः एकदा धोकादायक बनला.या अगोदरही असा प्रकार घडला होतो त्यावेळी याची कल्पना भाजप शक्तीकेंद्र प्रमुख ओटवणे ग्रा. सदस्य प्रशांत बुराण यांनी दिली मात्र संभंधित यंत्रणेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.अखेर 'रोज मरे त्याला कोण रडडे ' असे म्हणत अखेर ओटवणे येथील युवक जे नेहमीच अशा कामासाठी पुढे असतात त्या युवकांनी एकत्र येत हा चर व्यवस्थित बुजवून रस्ता वाहतुकी साठी सुकर बनविला.जे काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे होते ते युवकांनी केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भैरवकर, ग्रा. सदस्य प्रशांत बुराण, संतोष तावडे, सत्यवान गावकर, जयगणेश गावकर, निलेश माटेकर, ओमकार परब, नामदेव वारंग आदीनी श्रमदान केले. या रस्त्यावर सद्या वाहन चालकांना वाहन हाकतानाही अडचणी येत आहेत.रस्त्यावरील पडलेल्या चरामुळे अपघात झाल्यास याला सार्वजनिक बांधकाम खात जबादार राहणार का असा सवाल वारंवार विचारला जातो पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांना याच काही देण घेणं नाही.अपघात घडत असताना सुद्धा ही यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने वाहन चालक या मार्गातून रहदारी करणाऱ्यामध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

