Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ओटवणेत जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस साजरा

ओटवणेत जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस साजरा

ओटवणे (प्रतिनिधी ) माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास सावंत यांचा वाढदिवस त्यांच्या मतदार संघातील सहाही गावात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ओटवणे येथील युतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस २७ मे रोजी साजरा केला.

या निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू, सिंधू कलाकार मंच ऑर्केस्ट्रा आणि त्यानंतर श्री सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी यांचा यक्ष चंडिका युद्ध हा दशावतार नाट्य प्रयोग साजरा करण्यात आला उशिरा म्हणजे रात्री १२ वाजता नाटका दरम्यान विक्रांत सावंत यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी ओटवणे गावच्या वतीने सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांनी त्यांना शुभेच्छा देताना सातेरी रवळनाथा चरणी साकडही घातले. विक्रांत सावंत यांनी ही लोकांच्या शुभेच्छा स्वीकल्या लोकांचे आभार मानलेत व येणाऱ्या काळात या भागात जास्तीत जास्त शासनाच्या योजना राबविण्या बरोबर जो विश्वास आपण टाकलात तो विश्वास सार्थकी लावत विकासात्मक कामाला प्राधान्य दिल जाणार असल्याचे सांगीतले यावेळी ओटवणे भाजप आणि युतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला तर जय भीम युवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जाधववाडी च्या वतीनेही त्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर,ग्रा. सदस्य प्रशांत बुराण,ग्रा. सदस्य महेश चव्हाण,दशरथ शृंगारे, विठ्ठल गावकर, संतोष सावंत, रामदास पारकर,दिनेश गावकर, विश्वनाथ कोटकर,गुंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital