Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंढरपूरत दुमदुमला,"सहस्त्रनामाचा घोष

पंढरपूरत दुमदुमला,"सहस्त्रनामाचा घोष

त्नागिरी :- रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध प्रति पंढरपूर ओळख असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त काल गुरुवार कमला एकादशी च्या शुभ दिनी दिनाक ११ जून २६ रोजी श्री विठ्ठल रखुमाई समोर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा सहस्त्रनाम ब्रह्मवृंदाकडून म्हणण्यात आला.

पहाटे नित्य काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्री विठ्ठल रखुमाईची पंचसूक्त पावमान अभिषेक करून षोडशोपचारीक पूजा संस्थेचे सेक्रेटरी श्री राजनशेठ फाळके यांनी सपत्नीक केली .
सायंकाळी ठीक पाच वाजता रत्नागिरीतील ज्येष्ठ क्षेत्रोपाध्ये गुरुजी श्री गिरीश भाऊ जोशी आणि ब्रह्मावृंद यांनी श्री विठ्ठलाची पूजा करून सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला सुरुवात केली, त्याचवेळी श्री विठ्ठलाला सहस्त्र तुळशीदल अर्पण करण्यात आली विठ्ठल रखुमाईच्या संपूर्ण मूर्ती भोवती हजारो तुळशी पत्रांच्या सजावटीमुळे मंदिरातील वातावरण अतिशय छान दिसत होते. सात वाजता सहस्त्रनाम संपल्यानंतर विठ्ठलाची असंख्य भाविकांच्या उपस्थितीत नित्य आरती आणि त्यानंतर ५६ भोगप्रसाद करण्यात आला सर्व उपस्थित भक्त मंडळींनाप्रसाद वाटप झाल्यावर, रात्री व्याडेश्वर भजन मंडळाचे सुश्राव्य भजन बापू शिंदे बुवा यांनी सादर केले.
पुरुषोत्तम मासाच्या या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री अशोकराव मयेकर आणि उपाध्यक्ष श्री आनंदराव मराठे यांच्या नियोजनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन संपन्न केले.
या कार्यक्रमासाठी काल संपूर्ण दिवस प्रति पंढरपुरात भाविकांची गर्दी झाली होती.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विजयराव पेडणेकर , प्रमोदशेठ रेडिज,प्रवीण हेळेकर पराग हेळेकर ,पराग तोडणकर , संकेत मयेकर तसेच विठ्ठल मंदिर संस्थेची सर्व कार्यकारणी आणि विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital