Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'परुळे विद्यामंदिर'चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

'परुळे विद्यामंदिर'चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

परुळे : प्रतिनिधी

हाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ७ वी) परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून, यामध्ये 'अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे' या शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

या प्रतिष्ठेच्या परीक्षेत प्रशालेच्या विद्यार्थ्याने तालुका आणि जिल्हा पातळीवर नेत्रदीपक यश मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

प्रशालेचा हुशार विद्यार्थी कु. अतीश अमेय सामंत याने ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ६७.३३% गुणांची कमाई करत जिल्ह्यात ३८ वा, तर वेंगुर्ले तालुक्यात चौथा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या या यशाबरोबरच पलाक्षी प्रवीण परुळेकर आणि नील सुशीलकुमार चिपकर या विद्यार्थ्यांनीही उत्तम गुणांसह या परीक्षेत यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या अनुभवी शिक्षकांचे आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, सचिव ॲड. विशाल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी सर्व गुणवंतांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे जाहीर अभिनंदन केले आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण परुळे पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital