Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाटपन्हाळे महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक व आरोग्य विषयक मार्गदर्शन व्याख्यान

पाटपन्हाळे महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक व आरोग्य विषयक मार्गदर्शन व्याख्यान

गुहागर प्रतिनिधी: पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्षाच्या वतीने 'महिलांचे आर्थिक व आरोग्य सक्षमीकरण' या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. ए. देसाई हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला चिपळूण येथील आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. डॉ. प्रा. सौ. रोहिणी दीपक ओतारी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये त्यांनी महिलांच्या आर्थिक साक्षरतेचे महत्त्व, बचत, गुंतवणूक, विमा, आर्थिक नियोजन, उद्योजकतेच्या संधी तसेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आरोग्यदृष्ट्या सुदृढ महिला ही कुटुंब व समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच उपस्थित विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या अनेक बाबींची माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींनी शिक्षणासोबत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. ज्ञान, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला असे म्हटले.
सदर कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला विकास कक्षातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. सौम्या चौघुले यांनी केले, तर प्रा. कांचन कदम यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital