Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं कोल्हापूर सजलं.

फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं कोल्हापूर सजलं.

खेळाडू आणि संघाचे चौकाचौकात होर्डिंग..

क्रिकेट वेड्या देशातील फुटबॉल वेडे शहर कोल्हापूर

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापुर : सध्या फुटबॉल विश्वचषकाचा (FIFA World Cup) मोठा ज्वर पाहायला मिळत आहे.शहरात मेस्सी, रोनाल्डो आणि एमबाप्पे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे कटआउट्स व फ्लेक्स लागले असून, स्थानिक 'तालिमीं'मध्ये सामने थेट दाखवण्याची जय्यत तयारी सुरू आहे.

कोल्हापूरच्या गल्लीबोळात ब्राझील, अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या जर्सींना प्रचंड मागणी आहे.फुटबॉलप्रेमी खेळाडूंचे वाढदिवस आणि विश्वचषकाचा जल्लोष साजरा करण्यासाठी खास थीम केक बनवण्याचे बेकर्सनी प्लॅन केले आहे.
स्पेनच्या सुप्रसिद्ध Sevilla FC क्लबने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर कोल्हापूरच्या ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमचा फोटो पोस्ट करून कोल्हापुरी फुटबॉलच्या वेडाचे कौतुक केले आहे.

चार वर्षांनी येणारा फुटबॉलचा महाकुंभ फिफा विश्वचषक स्पर्धा आजपासून अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. तब्बल ४८ देश, १०४ सामने या स्पर्धेदरम्यान खेळले जाणार आहेत. यासाठी जगभरातील फुटबॉल शौकिनांमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ या पारंपारिक पेठांमधील फुटबॉल प्रेमी विश्वचषकासाठी सज्ज झाले आहेत.

कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून दरवर्षीचा फुटबॉल हंगाम सुरू होतो. यासाठी कोल्हापूर शहरातील तालमी आणि पेठांचे संघ सहभागी होतात. हे सामने पाहण्यासाठी लक्षणीय गर्दी स्टेडियमवर पाहायला मिळते. यासोबतच पेठमध्ये जगभरातील अनेक देशांच्या प्रसिद्ध खेळाडूंचे फॅन्स क्लब आहेत. पोर्तुगालचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, अर्जंटीना संघाचा खेळाडू लिओनल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार या खेळाडूंची कट्टर चाहते कोल्हापुरात पाहायला मिळतात. या तिन्हीही प्रसिद्ध खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे

आजपासून सुरू होणाऱ्या फुटबॉलचे सामने आम्ही एकत्र कुटुंबांच्या सदस्या सोबत पाहणार असल्याचा निश्चय मंगळवार पेठेत राहणाऱ्या श्रावणी हिर्लोस्कर आणि श्वेशा शेळके यांनी केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital