दोडामार्ग / मुंबई: प्रतिनिधी
पिकुळे गावाचे सुपुत्र, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ (मुंबई) चे सचिव तसेच तळकोकण विकास मंच (मुंबई) चे अध्यक्ष श्री. प्रमोद गवस यांचे आज सकाळी ६.०० वाजता त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी दुःखाद निधन झाले.
त्यांच्या अकस्मात जाण्याने पिकुळे गावावर आणि तळकोकणातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
श्री. प्रमोद शंकर गवस यांनी पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या माध्यमातून मुंबईत वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना एकत्र बांधून ठेवण्याचे मोलाचे काम केले. यासोबतच तळकोकण विकास मंचच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत त्यांनी कोकणाच्या, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध विकासात्मक व सामाजिक प्रश्नांवर सतत आवाज उठवला. तसेच श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेत सुवर्ण महोत्सवी वर्षात भरीव कामगिरी केली होती त्यांनी पूर्णपणे शाळेचे छप्पर बदलून नव्याने दुरुस्ती कामात भरीव योगदान दिले होते तसेच भविष्यातही त्याचा ग्रामीण भागातील मुलांसाठी सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांची मोठी तळमळ होती श्री प्रमोद गवस यांचे अकाली जाण्याने शाळेचा आधार निखळला आहे अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, चुलते असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ॲड अनिल गवस व सुनील गवस यांचे मोठे बंधू होत.

