Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलीस पाटील संघटनेचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना लेखी निवेदन.

पोलीस पाटील संघटनेचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना लेखी निवेदन.

ओटवणे (प्रतिनिधी ) सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदन देत आपल्या समस्यांचा पाढाच वाचला असून पोलीस पाटील यांना जी अतिरिक्त कामे लादली जातात याबद्दल आवाज उठवीला .खरं तर गाव पातळीवर पोलीस पाटील या पदाला मानाचे पद मानले जाते.पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्वाचा दुवा बनत गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच गावात कोणतेही वाद विवाद न होता समस्या सोडविण्याचं काम पोलीस पाटील प्रामाणिक पणे करताना दिसतात.

अशावेळी इतर कामाबरोबर नियमबाह्य महसुली कामांचा भार हा टाकला जावू नये. पोलीस पाटील यांना पीक पाहणीच्या कामातून तात्काळ मुक्त करावे अशी मागणी राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सावंतवाडी तालुका संघटनेच्यावतीने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या पोलीस पाटील यांच्याकडून पीक पाहणीसारखी महसुली कामे करून घेतली जात आहेत. ही बाब महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६० मधील पोलीस पाटील यांच्या विहीत कर्तव्याशी सुसंगत नाही. पीक पाहणीसाठी सहाय्यक नेमण्याबाबत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात पोलीस पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही. शेतशिवारातील प्रत्यक्ष पाहणीदरम्यान सर्पदंश, वन्य प्राण्यांचा धोका तसेच जमिनीच्या वहिवाटीवरील वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे पोलीस पाटलांवर नियमबाह्य महसुली कामांचा भार टाकू नये. पर्यायाने पोलीस पाटील यांना पीक पाहणीच्या कामातून तात्काळ मुक्त करावे. अन्यथा संघटनेला लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष- नितीन नाईक (मडुरे), जिल्हा उपाध्यक्ष व तालुका सचिव लक्ष्मण गावकर, (ओटवणे), प्रांत समिती अध्यक्ष जागृती गावडे (इन्सुली), सावंतवाडी बांदा अध्यक्ष श्रीपाद ठाकूर (नाणोस), प्रशांत पंडीत (कास), सावंतवाडी उपाध्यक्ष-/ बाबू परब (बावळाट) आदी सावंतवाडी तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital