गौरव पोंक्षे माखजन
३१ जुलै २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागाला कृषी सक्षम दर्जा देण्यात आला. परंतु या मधील एकाही गोष्टीचा लाभ पोल्ट्री फार्मर शेतकऱ्यांना मिळालेला नाही.त्या शासन निर्णयाची ची अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटनेच्या वतीने चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे आमदार मा श्री शेखर निकम यांची भेट घेण्यात आली.व सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेकडून मुद्देसूत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य आयुक्तालयामार्फत पारीत करण्यात झालेल्या सुचना जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी दुर्लक्षित करून पोल्ट्री फार्मर शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत.
हे लक्षात आणून देण्यात आले व त्या प्रमाणे आ.शेखर निकम यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रयत्न करतो ,व पाठपुरावा करतो असे सांगितले.यावेळी शशिकांत घाणेकर,बबू कवळकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

