राजापूर प्रतिनिधी राजापुरात गेले दोन दिवस मुसळधार पडणारा पाऊस आणि शहरात निर्माण झालेली पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी जनतेला सावधानतेचे व सतर्कचे आवाहन केले आहे.
सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे व धरण परिसरातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. सर्व नागरिकांनी सतर्क राहून पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
* नदी, नाले, पूल, धबधबे व पूरग्रस्त भागात जाणे टाळावे.
* पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी रस्ता किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
* हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
* आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक कागदपत्रे, औषधे, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक वस्तू सुरक्षित ठेवाव्यात.
* वीजेच्या तारा, विद्युत उपकरणे व पाण्यातील विद्युत धोक्यांपासून सावध राहावे.
* लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
* कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
* आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक ग्राम प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा.
आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहावे. असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.

