Dailyhunt
राजेश नाईक यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण संघटकपदी नियुक्ती

राजेश नाईक यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण संघटकपदी नियुक्ती

सावंतवाडी । प्रतिनिधी : संवाद मीडिया चे संपादक राजेश नाईक यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या घटकांचे हित जपण्यासाठी तसेच या माध्यमाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महासचिव विकास भोसले आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांच्या आदेशानुसार ही महत्त्वाची जबाबदारी राजेश नाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital