Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत तेजू पडवळकर यांची बैलजोडी विजेती!

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत तेजू पडवळकर यांची बैलजोडी विजेती!

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर

मालवण तालुक्यातील मालोंड सडा येथे राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक गवाणे येथील तेजू पडवळकर यांनी, द्वितीय क्रमांक अभिनव राणे -कणकवली आणि तृतीय क्रमांक अविष्कार ठाकूर यांच्या बैल जोडीला मिळाला.

प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे 35 हजार , 25 हजार, 20 हजार रुपये आणि मानाची ढाल तसेच चतुर्थ क्रमांकाला रुपये १७,०००/- व मानाची ढाल तर ५ ते १० क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये १५,०००/-, १२,०००/-, १०,०००/-, ८,०००/-, ७,०००/-,५,०००/- व मानाची ढाल तर ११ ते १५ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी रुपये २,०००/- व मानाची ढाल देऊन गौरविण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक मालवण तालुक्यातील चूनवरे गावचे रहिवासी असलेल्या राकेश परब यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीपासून राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी 50 बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. बक्षीस वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मजुर फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र प्रभूदेसाई, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, शिवसेना मालवण तालुका संपर्कप्रमुख पंकज वर्दम, शिवसेना उपतालुकाप्रमुख भाई चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन संदेश तांबे, आशिष ठाकूर तर स्पर्धेचे समालोचन प्रसिद्ध समालोचक रणजीत पाटील यांनी केले. स्पर्धेचे टाईम कीपर म्हणून निळकंठ मेस्त्री, गुणलेखक दीपक भोगले यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राकेश परब मित्रमंडळाचे सर्वेसर्वा राकेश परब, उद्योजक दयानंद प्रभूदेसाई, मनीष परब, पोलीस पाटील हर्षद घाडीगावकर, सचिन पाताडे, पंकज परब, शैलेश बागवे, ओंकार परब, स्नेहल परब, राखी परब, ज्योती परब व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. स्पर्धे दरम्यान पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी उपस्थिती दाखवून स्पर्धेच्या आयोजना बाबत राकेश परब मित्र मंडळाचे कौतुक केले.

मंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे यशस्वी आयोजन मागील काही महिन्यात करण्यात आले होते. यामुळे रसिकांना ग्रामस्थांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ मिळा ला होता. सलग दोन वर्ष राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीतून महाराष्ट्रातील बैलगाडा संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन येथील रसिकांना पाहता आले. याही पुढे येथील नागरिकांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम घेऊन चुनवरे गाव संपूर्ण देशाच्या नकाशावर झळकवण्याची अपेक्षा मंडळाचे सर्वेसर्वा राकेश परब यांनी व्यक्त केली. आभार उधोजक दयानंद प्रभुदेसाई यानी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital