Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रामेश्वर प्लाझा घेणार मोकळा श्वास

रामेश्वर प्लाझा घेणार मोकळा श्वास

नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम : स्टॉल धारकांना सूचना

अन्यथा कारवाई करणार : मुख्याधिकाऱ्यांचा इशारा

सावंतवाडी : गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी पार्किंगची व्यवस्था व वाहतूक कोंडी याबाबत नगरपालिका प्रशासनाने कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

शहरातील मोती तलावाच्या काठावर असलेल्या रामेश्वर प्लाझा इमारती समोरील अनधिकृत स्टॉल तसेच अधिकृत स्टॉल धारकांनी व भाडेकरूंनी केलेले अतिक्रमण त्वरित हटविण्याच्या सक्त सूचना नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दस्तूर खुद्द मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी बुधवारी रात्री उशिरा प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दोन दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास पालिकेकडून अतिक्रमण हटवण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या उद्भवत असल्याने नगरपालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून टप्प्याटप्प्यात शहरातील अन्य भागात देखील याबाबत कारवाई सुरू होणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital