Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
RATNAGIRI BREAKING: वेतोशी येथील गोवंश हत्या आणि तस्करीचा डाव ग्रामीण पोलिसांनी उधळला

RATNAGIRI BREAKING: वेतोशी येथील गोवंश हत्या आणि तस्करीचा डाव ग्रामीण पोलिसांनी उधळला

रत्नागिरीतील वेतोशी येथून येते आहे मोठी बातमी

वेतोशी येथे गो वंश हत्या प्रकरणी दोघांना अटक एक फरार

करबुडे हायवे ,फणसाळे मधली वाडी खुरीचा आंबा येथे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर गो वंश हत्येचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली

बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

गस्ती दरम्यान ही माहिती समोर आली, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री पालवे आणि त्यांच्या पथकाने केली मोठी कामगिरी

ग्रामीण पोलीस निरीक्षक पालवे साहेबांनी अत्यंत जलद गतीने गुन्हेगार हत्यार बंद असताना वेळीच सापळा रचून जीवाची पर्वा न करता एकाला पकडले आणि एक गुन्हेगार झाडीत फरार झाला होता तो सकाळी पकडला गेला एक फरार आहे त्याचा शोध सुरू आहे जंगलात

यात पोलिसांवर एकाने हत्यार उगारल्याची माहिती पुढे येते आहे

तिघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले

तर तिसरा माणूस पळून गेला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत

घटनास्थळावरून पोलिसांना गोवंश मांस सापडले आहे

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या नेतृत्वाखाली अन्य पोलीस फौज फाटा तैनात आहे

तर यावेळी सरपंच निलेश लोंढे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पवार पोलीस पाटील, विष्णू ठीक, ऋतुजा आंबेकर हे या ठिकाणी पोलिसांसोबत सकाळी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital