Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रत्नागिरी जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटोळे यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटोळे यांची बिनविरोध निवड

लांजा( प्रतिनिधी): लांजा आगारामध्ये सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या राजेंद्र पाटोळे यांची रत्नागिरी जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लांजा गावचे सुपुत्र असलेले राजेंद्र पाटोळे हे गेली अनेक वर्षे एसटी महामंडळात कार्यरत आहेत.‌
कर्मचारी व सभासदांशी असलेला सुसंवाद, कामाचा अनुभव, नेतृत्वगुण तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी असलेली सकारात्मक भूमिका यामुळे त्यांची रत्नागिरी जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी व सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, संस्थेचा आर्थिक कारभार अधिक सक्षम करणे आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेणे यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
राजेंद्र पाटोळे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल समस्त संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.‌ तसेच लांजा आगारातील एसटी कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, विविध स्तरांतून पाटोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital