Dailyhunt
रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी आनंद शेठ वीरकर यांची नियुक्ती

रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी आनंद शेठ वीरकर यांची नियुक्ती

त्नागिरी : येथील प्रथित यश अमेय ज्वेलर्स या सुवर्ण कारागिरी पेढीचे संस्थापक श्री आनंदशेठ वीरकर यांची 'रत्नागिरी जिल्हा व्हॅल्यूअर असोसिएशनच्या 'अध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड करण्यात आली .मुंबई येथे पार पडलेल्या या अधिवेशनाच्या प्रसंगी, भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या आमदार सौ.

चित्राताई वाघ यांनी ही जबाबदारी आनंद शेठ वीरकर यांच्यावर सोपवून आतापर्यंतच्या विरकर यांच्या कामाची एक प्रकारे पोच पावतीच दिली आहे. या निवडी बद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संस्था, सुवर्णकारागीर, व्यापारी बंधू आणि तमाम दैवज्ञ बांधवांकडून आनंद शेठ वीरकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .ही जबाबदारी ते व्यवस्थित रित्या सांभाळतील असा विश्वास जनतेमधून व्यक्त होत आहे. आज पार पडलेल्या दैवज्ञ हितावर्धक नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरीच्या सभेमध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराव पेडणेकर यांच्या हस्ते त्यांचं कौतुक करण्यात आलं. आणि दैवज्ञ पतसंस्थेच्या संचालकांचा झालेला गौरव ही संस्थेला भूषणावह अशी घटना आहे असे गौरवोद्गार काढले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital