Dailyhunt
रत्नागिरीत थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीमध्ये थरार कैद  अँकर

रत्नागिरीत थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीमध्ये थरार कैद अँकर

त्नागिरी: रत्नागिरी शहराचे ऐतिहासिक आकर्षण असलेल्या थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या सुमारास स्थानिक रहिवासी रुपेश रघुनाथ सावंत यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रात्रीच्या शांततेत बिबट्या सावजाच्या शोधात सावंत यांच्या आवारात शिरला होता. काही वेळ परिसरात वावरल्यानंतर तो पुन्हा अंधारात गायब झाला. आज सकाळी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने सावंत कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक चक्रावून गेले.
थिबा पॅलेस हा परिसर पर्यटकांच्या वर्दळीचा आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे. बिबट्याचा वावर आता सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाल्याने वनविभागाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital