Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी एकवटले मदतीचे हात

रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी एकवटले मदतीचे हात

हिवाशी संघ साई मंदिर मालवणची मोलाची मदत : 100 इडियट ग्रुप व मालवण olx ग्रुप कडूनही मदत

मालवण | प्रतिनिधी : दांडी येथील सौ. रविना रविंद्र रेवंडकर (वय 45) ही महिला गंभीर आजारावर उपचार घेत आहे.

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व कुटुंबाचा आर्थिक परिस्थिती बेताची आहे. रविना रेवंडकर यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा खर्च मोठा असून कुटुंबाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाज माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे.

रविना रेवंडकर यांचे माहेर असलेल्या धुरीवाडा येथील रहिवाशी संघ साई मंदिर मालवण यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी एकत्र येत सुमारे 66 हजार मदत एकत्र करून रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी सुपूर्द केली आहे. यावेळी राजू बिडये, महेश सारंग, निलेश तळाशीलकर, गणेश परब, प्रशांत साळसकर व नागरिक उपस्थित होते.

100 इडियट ग्रुप व मालवण olx व्हाट्सअप ग्रुपचाही मदतीचा हात

रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी करण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत 100 इडियट ग्रुप व मालवण olx व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनीही मदतीचा हात दिला. 100 इडियट ग्रुप च्या माध्यमातून यापूर्वीही अनेकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठा मदतीचा हात देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital