Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रायपाटण-पाचल मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

रायपाटण-पाचल मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

राजापूर | प्रतिनिधी :

राजापूर तालुक्यातील रायपाटण-पाचल सीमेवरील हरळ परिसरात शनिवारी (दि. ४ जुलै) झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार नितेश चिमाजी साळवी यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश साळवी हे त्यांच्या एमएच ०३ एक्स ६९७३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात असताना एमएच ४६ सीयू २११६ क्रमांकाच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत साळवी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रायपाटण येथील विनायक लिंगायत यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून गाडीतील चादरीच्या साहाय्याने जखमीला सुरक्षितपणे उचलले. कोणाचीही वाट न पाहता त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि स्वतःच्या वाहनातून जखमीला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले होते.

जखमीची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या मदतकार्यात संतोष गांगण, सुभाष शेटे, महादेव शिंदे आणि दामाजी पांचाळ यांनीही मोलाचे सहकार्य केले.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण आणि अन्य बाबींचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital