Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सडुरे येथे पीएम-प्रणाम अभियानांतर्गत महिला शेतकरी कृषी दिन साजरा

सडुरे येथे पीएम-प्रणाम अभियानांतर्गत महिला शेतकरी कृषी दिन साजरा

महिला शेतकऱ्यांना देण्यात आले आधुनिक शेतीचे धडे

वैभववाडी प्रतिनिधी :

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संतुलित खतांचा वापर आणि माती परीक्षणाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसह शेतीचा खर्च कमी करण्यासाठी महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरसीएफ व्यवस्थापक विपणन तथा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी एस व्ही राजशिर्के यांनी केले.

सडुरे येथे पीएम-प्रणाम (PM-PRANAM) अभियानांतर्गत आयोजित महिला शेतकरी कृषी दिन कार्यक्रमात विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे ४३ महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी आरसीएफचे व्यवस्थापक (विपणन) तथा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी एस. व्ही. राजेशिर्के यांनी आरसीएफ कंपनीच्या विविध खत उत्पादनांची माहिती दिली. यामध्ये सुफला, युरिया, सल्फर कोटेड गोल्ड युरिया, जलविद्राव्य खते, सुजला, मायक्रोन्यूट्रिएंट्स (मायक्रोला), जैविक खते (बायोला), एफओएम तसेच सेंद्रिय खतांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना योग्य पद्धतीने कसा घ्यावा, माती परीक्षणाचे महत्त्व आणि त्यातून होणारे फायदे याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

उप कृषी अधिकारी विनिका तिरवडे यांनी पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय पाटील यांनी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) तसेच शेतकरी क्षेत्रीय शाळा (FFS) प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.

आरसीएफ ड्रोन दीदी प्रिया तावडे यांनी शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचे फायदे, वेळ व खर्चाची बचत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी प्रभावी वापर याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान महिला शेतकऱ्यांनी कृषीविषयक विविध प्रश्न उपस्थित केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंका व समस्यांचे निरसन केले. शेतकरी महिला बचत गट आणि आरसीएफचे अधिकारी संघर्ष टेमकर यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital