Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सद्यस्थिती बदलण्यासाठी हिंदूंनी एकजुटीने उभे राहणे काळाची गरज : प्रा. सचिन परुळकर

सद्यस्थिती बदलण्यासाठी हिंदूंनी एकजुटीने उभे राहणे काळाची गरज : प्रा. सचिन परुळकर

वेंगुर्ले येथे भक्तिमय वातावरणात सनातन संस्थेची गुरुपौर्णिमा साजरी

वेंगुर्ले : प्रतिनिधी
आज देश आणि धर्म यावर वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे.

घुसखोरांनी देश पोखरला आहे. जेन झी ला भडकावून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. जातीपातीमध्ये हिंदूंना विभाजित करण्याचे आणि त्यांना एकमेकांमध्ये लढवण्याचे प्रयत्न होत आहेत. झरळ या शब्दाचा विपर्यास करत दोन महिन्यांपूर्वी कॉक्रोज जनता पार्टी बनली आणि तिच्या आंदोलनाला देशभर प्रसिद्धी मिळाली. कारण भारत विरोधकांची एक इकोसिस्टीम आहे. भारताला दारुण इस्लाम बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून हिंदूंनी एकजुटीने उभे राहणे काळाची गरज आहे, असे आवाहन वेंगुर्लेतील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. सचिन परुळकर यांनी केले आहे.

वेंगुर्ले येथील साई दरबार सभागृह येथे सनातन संस्थेच्या वतीने दि. २९ जुलै रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात 'गुरुपौर्णिमा महोत्सव' साजरा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. परुळकर बोलत होते.

सकाळ च्या सत्रात व्यासपूजा आणि गुरुपूजन करण्यात आले. भूषण जोशी यांनी पौरोहित्य केले तर श्री. अनिल परुळकर व सौ. अंकिता परुळकर यांनी पूजन केले. त्यानंतर गुरूंची भावपूर्ण आरती करण्यात आली.

सायंकाळ च्या सत्रात प्रथम संतसंदेश वाचन सौ. श्रद्धा जुवलेकर यांनी केले. त्यानंतर राम राज्य स्थापनेचा संकल्प करत श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. पुढे साधिका श्रीमती सरिता प्रभू यांनी अनुभव कथन केले. यावेळी पुढे बोलताना प्रा. परुळकर म्हणाले की, हिंदू समाजावर होणाऱ्या आघातांचे मुख्य कारण म्हणजे हिंदूंचा असंघटित पणा. जोपर्यंत माझ्यावर संकट येत नाही तोपर्यंत जागृत व्हायचं नाही या मानसिकतेमुळे अनेक प्रांतातून हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली. काश्मीर, कैराना, मालदा अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. म्हणूनच आपण हिंदूंनी संघटित होऊया. स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी स्वसंरक्षण घेऊया असे ही त्यांनी सांगितले.

समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या 'रामराज्याची' नितांत आवश्यकता : सौ. ज्योस्ना नारकर
'संपूर्ण जगावर घोंगावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित 'रामराज्याची' नितांत आवश्यकता आहे. मात्र, हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला 'साधनेचे' आणि 'गुरुचरणांचे' भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात परिवर्तित होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते,' यासाठी सर्वांनी राम नामाचा जप करा, दररोज रामरक्षा म्हणा असे प्रतिपादन सनातन संस्थे च्या सौ. ज्योस्ना नारकर यांनी केले.

वेंगुर्ले येथील या गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठी उपस्थिती होती.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, आरवली वेतोबा देवस्थान अध्यक्ष जयवंत उर्फ बाळा राय, तुळस येथील उत्सव हॉल चे मालक आनंद तांडेल, वायंगणी ग्रामपंचायत माजी उपसरपंच रवींद्र धोंड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सौ. मानसी आंगचेकर यांनी मानले. कार्यक्रम स्थळी औषधी वनस्पती, स्वसंरक्षण, प्रथमोपचार, ग्रंथसंपदा, देवघराची मांडणी असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्याचाही उपस्थितानी लाभ घेतला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital