Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समाजाला आरोग्य कवच निर्माण करणाऱ्या रामपूरमधील डॉक्टरांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान

समाजाला आरोग्य कवच निर्माण करणाऱ्या रामपूरमधील डॉक्टरांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : डॉक्टर ' डे' असल्याने रामपूर मधील डॉक्टरांचा रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. समाजाला आरोग्याचे कवच निर्माण करणारे, रुग्णांसाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

रामपूर येथील श्री हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. वर्षा चव्हाण, धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ. मनोज रावराणे, डॉ. मृणालिनी रावराणे, सिद्धीविनायक हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील, डॉ. प्राची पाटील, गुढे फाटा रामपूर येथील साई क्लिनिकचे डॉ. जगदीश पाटेकर, डॉ. वैष्णवी पाटेकर यांचा घटनास्थळी जाऊन गुलाबपुष्प देऊन अनिलकुमार जोशी यांनी सन्मान करून 'डॉक्टर डे' च्या शुभेच्छा दिल्या. रुग्णांना चांगली सेवा देण्याची सदिच्छा व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital