Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'तर्फे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना शुभेच्छा

'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'तर्फे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना शुभेच्छा

आपत्ती काळात संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही

सावंतवाडी :सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या टिमने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची सौहार्दपूर्ण भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी कोणत्याही आपत्तीच्या काळात किंवा संकटप्रसंगी सामाजिक बांधिलकी संघटनेकडून पोलीस प्रशासनाला नेहमीच पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

या भेटीदरम्यान संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच आपत्कालीन परिस्थितीत सहकार्याच्या भूमिकेवर चर्चा झाली. या वेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक सर, खजिनदार रवि जाधव, सेक्रेटरी समिरा खलिल, सौ. शरदिनी बागवे, रूपा गौडर आणि लक्ष्मण कदम आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital