Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समुद्रकिनारी भरधाव गाडी चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

समुद्रकिनारी भरधाव गाडी चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली (प्रतिनिधी:

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉनस्टेबल दिलीप बाळकृष्ण नवले (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी इर्टिगा वाहन क्रमांक MH-42-BJ-4746 च्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काल ८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मुरुड समुद्रकिनारी या वाहन चालकाने समुद्रकिनारी असलेल्या वाळूत वाहन भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवून तेथे उपस्थित पर्यटकांना दुखापत होण्याचा धोका निर्माण केला. तसेच वाहन धोकादायकरीत्या चालवून सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा आणली.
या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस हेड कॉनस्टेबल सडकर करत आहेत.
मुरुड येथे पर्यटनासाठी आलेल्या वाहनचालकाने समुद्रकिनारी केलेल्या या स्टंटचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. मुरुड येथील नागरिकांनी या वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणीही केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital