एकाला वाचवले : मालवण समुद्रातील घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठिमागील खडकाळ परिसरात मासेमारीस गेलेली 'सागरिका' ही नौका लाटांच्या तडाक्यात मंगळवारी पहाटे बुडाली.
नौकेतील तीन पैकी दोघे मच्छिमार यांचा बुडून मृत्यु झाला तर एक मच्छिमार सुदैवाने बचावला आहे.
मालवणच्या दांडी येथील मच्छिमार तथा भाजपा मालवण उपाध्यक्ष असलेले नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे हे तिघे 'सागरिका' या नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक नौका समुद्राच्या लाटांमुळे बुडाली. या दुर्घटनेनंतर बचाव कार्यात सुयोग परब यांना स्थानिक मच्छिमारांनी पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं.मात्र दुर्दैवाने नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे मालवणच्या दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भाजपा जिल्हा चिटणीस माजी नगरसेविका सेजल परब यांचे संमेश हे पती होतं. सन्मेष परब व अक्षय राणे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

