Dailyhunt
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुका कार्यालय उपयोग : जिल्हा अध्यक्ष सतिश मोरे

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुका कार्यालय उपयोग : जिल्हा अध्यक्ष सतिश मोरे

मंडणगड | प्रतिनिधी - महिला, विद्यार्थी, शेतकरी, जेष्ठ नागरीक शेवटच्या थरातील समाज घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नवीन तालुका कार्यालयाचा उपयोग केला जाणार आहे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष सतिश मोरे यांनी मंडणगड येथे केले 4 एप्रिल 2026 रोजी पार्टीचे मंडणगड शहरातील नुतन कार्यालयाचे उद्घाटन तालुक्यातील पार्टिचे कार्यकर्ते व मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले

या निमीत्ताने आयोजीत स्वागत समारंभात ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले पार्टीचे संघटनात्मक बांधणीची धोरणे व नियमानुसार लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा दत्ताराम महाडीक या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची तालुक्याचे अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून ग्रामिण भागातील जनतेचे प्रश्न सोडवत तालुक्यात पार्टीचा विस्तार करण्याचे धोरण आहे याकरिता तालुक्यातील जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्रीत संगम साधून पक्ष वाढीसाठी संघटीत प्रयत्न केले जातील नाराजांची नाराजी ही दूर केली जाईल व आगामी पंधरा दिवसात तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल. या कार्यक्रमास कोकण पदवीधर मतदार संघाचे जिल्हा सह संयोजक अजय दळवी तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक, सचिन थोरे, विश्वदास लोखंडे, वसंत सुतार, सुशिल दळवी, आकाश नाविलकर, शैलेश तपकिरे, यश महेता, रामदास भागडे, आनंद नारकर, वैभव नारकर,पृथ्वीराज चव्हाण, विलास भागडे, नागेश जगताप, अशोक गोविलकर, राजेश पारेख, सुशिल दळवी, महेंद्र मोरे, सुय़श थोरे, संजय पवार, संदेश बर्जे, अविनाश सागवेकर, सौ. काजल लोखंडे, स्मिता थोरे, सुशिला पाटील, यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे औचीत्यसाधून कुंबळे येथील ग्रामस्थ रमेश दळवी, नौशाद कुटरेकर व सहकाऱ्यांनी तसेच पाली येथील ग्रामस्थ विजय दुर्गवले व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital