लांजा (प्रतिनिधी): सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं. १ येथे सायबर गुन्ह्या संदर्भात शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच पार पडला यासाठी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पूर्वा सुर्वे, अनुष्का झगडे, हर्षदा कर्लेकर तसेच आयुष घाडी हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ श्रद्धा कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. .
सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, पासवर्ड कसा निवडावा, ऑनलाइन फसवणुकीपासून कसे वाचवावे याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थिनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्ताराम गोरे तर आभार अनंत कदम यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

