Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला गडहिंग्लज येथील एक पर्यटक बुडाला.

शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला गडहिंग्लज येथील एक पर्यटक बुडाला.

एक जण बचावला : पोलिस घटनास्थळी दाखल

वेंगुर्ले : दाजी नाईक

शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी आज मंगळवार २ जून रोजी सायंकाळी एक पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रणव देवमाने वय २१ वर्ष रा. गडहिंग्लज असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या सोबत असलेला दुसरा पर्यटक पोहून पाण्याबाहेर आल्याने बचावला आहे.

दरम्यान माहिती मिळताच शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बुडालेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग होडी पलटी होऊन समुद्रात बुडाले होते. ही दुर्घघटना ताजी असतानाच आज एक पर्यटक शिरोडा येथील समुद्रात बुडाल्याचे समोर आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital