रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रीज (जीजीपीएस) माध्यमाच्या शाळेने यशाची परंपरा कायम राखत शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले. गुणवत्ता यादीत शाळेच्या १५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये इयत्ता पाचवीमधील सृष्टी संदीप पाटील (गुणवत्ता यादी क्र. १४), स्वरा राजेंद्र पवार (४७), अथर्व विकास सारदळ (६०), स्वरा सदानंद आग्रे (८०), कनक संतोष सातवेकर (८३), शौर्या निलेश देसाई (८९), मिहिरा प्रमोद कांबळे (९०), साध्वी स्नेहराज साळुंखे (१००), खुशी निलेश पाटील (१०२) यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पाचवीसाठी १०२ विद्यार्थी बसले होते त्यातील ७५ विद्यार्थी पात्र झाले व ९ जण गुणवत्ता यादीत चमकले. एकूण निकाल ७४.२५ टक्के लागला.
इयत्ता आठवीमधील श्रीतेज दीपक माळी (गुणवत्ता यादी क्र. ३), सोहम सदानंद आग्रे (१५), आर्य सस्मित पवार (२६), शल्वि प्रदीप शिवगण (२७), चैतन्य विवेक नवरे (३९), तनिष प्रशांत मायनाक (४०) या ६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. शाळेतील ६७ विद्यार्थी बसले होते, त्यातील ३८ विद्यार्थी पात्र झाले. निकाल ५८.४६ टक्के लागला.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मूरकर, गुरुकुल विभागाचे प्रमुख वासुदेव परांजपे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, शाळा समिती अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ, प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सुहास पटवर्धन, गुरुकुल विभाग शाळा समिती अध्यक्ष अॅड. प्राची जोशी, पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

